नायगाव ग्रा.पं.च्या गैरकारभाराची चौकशी पुर्ण होईपर्यंत घरकुलाचे अनुदान थांबविण्याची मागणी

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीत गैरकारभार झाला असून मंजूर झालेल्या बोगस घरकुलांची सखोली व पारदर्शक चौकशी होईपर्यंत घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान तत्काळ थांबविण्याचे यावे अशी मागणी उपसरंपच पती रामदास पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. 

दरम्यान आज रामदास पाटील यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नायगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या भ्रष्ठाचार भोंगळ व गैरकारभार याविषयी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी वेळोवेळी लिखित निवेदने दिली आहेत. पाटील यांनी म्हटले आहे. नायगाव पासून ७ किलोमिटर लांब असलेल्या निमछाव या आदीवासी वस्ती निर्माण झाली. या ठिकाणी ८ घरकुले मंजूर करण्यात आली आहे. तीन लाभार्थ्यांचे शेवटचे धनादेश बाकी आहेत. सर्व बोगस घरकुलाची माहिती कार्यालयीन बांधकाम अभियंता यांना देखील आहे. नायगाव ग्रामपंचायतमध्ये काल बुधवारी १४ जुलै रोजी गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी स्वतः भेट दरम्यान या ८ घरकुल लाभार्थ्यांपैक्की दोन लाभार्थी हे बाहेरगावी गेल्याची खोटी बतावणी करून गैरहजर राहीलेत. या घरकुल लाभार्थ्यांकडे नायगाव ग्रामपंचायत क्षेत्रात कधीपासून राहतात. त्यांच्याकडे आधारकार्ड व रेशनकार्ड असा काही पुरावा आहे का नाही ? यामुळे हा सर्व विषय संशयास्पद असल्याचे म्हटले आहे.

 

या सर्व प्रकरणात ग्रामसेवक यांनी म्हटले आहे की सन २०११ च्या जनगणनाच्या यादीनुसार घरकुल लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. मात्र लाभार्थ्यांची नावे उपलब्ध होत नसल्याचे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सर्व लाभार्थ्यांकडे मात्र मध्यप्रदेशमध्ये राहात असल्याचा पुरावा आहे. ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक हे संगनमताने गावाच्या सर्वांगीण विकासाकरीता आलेल्या निधीत मोठ्या प्रमाणावर गैरकारभार करीत आहे. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी भ्रष्टाचार, गैरकारभाराची व बोगस घरकुलांची चौकशी  करावी. चौकशी न केल्यास यावल पंचायत समितीसमोर उपोषणाला बसण्याचा इशारा नायगावच्या उपसरपंच यांचे पती रामदास निंबा पाटील व ग्रामपंचायत सदस्य राजु भिका तडवी यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

Protected Content