आशादीप वस्तीगृहातील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ

जळगाव प्रतिनिधी । गणेश कॉलनी येथील शासकीय आशादीप महिला वस्तीगृहातील कर्मचारी महिलेला शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, गणेश कॉलनीतील आशादीप वसतीगृहात गैरप्रकार होत असल्याचे खोटी माहिती खिडकीतून ओरडुन सांगणाऱ्या या महिलेमुळे २ मे रोजी देखील गोंधळ घातला होता. त्यावेळी जननायक या संघटनेच्या सदस्यांनी महिलेचे मोबाईलमध्ये चित्रण करुन व्हायरल केले होते. काही वृत्तपत्र, वाहिन्यांनी याच व्हिडीओचा आधार घेत भडक बातम्या प्रसारीत केल्या. उच्चस्तरीय समितीने चौकशी करुन सर्व दोषींवर गुन्हे दाखल केले. खिडकीतून आरोळ्या मारणारी महिला खोटे बोलत असून ती मानसिक रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या महिलेवर सध्या उपचार देखील सुरू आहेत. अशात मंगळवारी ४ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास वसतीगृहातील एका पिडीत महिलेने झोपण्यासाठी खोली मागीतली. याचा राग आल्यामुळे मनोरुग्ण महिलेने महिला कर्मचारी आशा रामदास अनफट रा. नहाटा कॉलेज यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. तसेच चाकुने खुपसून मारुन टाकेल अशी धमकी देखील दिली आहे. या प्रकरणी आशा अनफट या महिलेच्या फिर्यादीवरुन मनोरुग्ण महिलेच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज पवार तपास करीत आहेत.

Protected Content