भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातून गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ५३ हजार रुपये किमतीच्या अनेक बॅटऱ्या आणि एक टी.व्ही.एस. कंपनीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२१ जून रोजी रात्री १० ते २२ जून रोजी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान नासिर खान रशीद खान (वय ५२, चालक, रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) यांच्यासह इतर तक्रारदारांच्या गाड्यांच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सफौ प्रदीप चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या गोपनीय माहितीच्या आधारे, चोरी केलेल्या गाड्यांच्या बॅटऱ्या भडगाव शहरातील समीर शेख कदीर शेख आणि शायब सैय्यद मुनव्वर (दोघे रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) यांनी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच, पोलिसांनी समीर शेख आणि शायब सैय्यद यांना ताब्यात घेतले. २२ जून रोजी त्यांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीत चौकशी केली असता, त्यांनी ग्रीनपार्कजवळील शाळेतून चोरी केलेल्या बॅटरीजसह इतर ठिकाणांहून चोरलेल्या बॅटऱ्यांची कबुली दिली. आरोपींनी काढून दिलेल्या बॅटऱ्या पोलिसांनी जप्त केल्या. यामध्ये EXIDE कंपनीच्या विविध गाड्यांच्या आणि ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या तसेच एक काळ्या रंगाची टी.व्ही.एस. वेगो दुचाकी (क्र. MH ०४ FX १२४७) असा एकूण ६३,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
पोलीस पथकाचे कौतुक
सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ प्रदीप चौधरी, पाहेकॉ निलेश ब्राम्हणकार, पोकॉ प्रवीण परदेशी, पोकॉ अमजद पठाण, पोकॉ सुनील राजपूत यांनी यशस्वीपणे पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास सफौ प्रदीप चौधरी करत आहेत.