यावल शहरात मरीमाता यात्रा उत्सवाच्या निमित्ताने बारागाडया ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात

  • यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील बुरूज चौक जवळील मरीमाताच्या छोटया यात्रा निमित्ताने बारागाडया ओढण्याचा कार्यक्रम मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावल शहरात जुन्या प्रथेनुसार अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी यावल सातोद मार्गावर जिल्हा परिपद ऊर्दू शाळेपासुन तर बुरुज चौकापर्यंत भगत बबलु कोळी व त्यांचे साथीदार बगले म्हणुन प्रविण भालेराव व रोहीत कोळी यांनी बारागाडया ओढल्या. यावेळी बारागाडया ओढण्याचे कार्यक्रम बघण्यासाठी शहरातील व परिसरातील भाविकांची मोठी गर्दी या ठिकाणी उपस्थित होती.
    यावलचे पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद गोसावी, सहाय्यक पोलीस निरिक्षक हरिष भोये, पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान पठाण व पोलिस कर्मचारी यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त होता. यावेळी शांतता समितीचे सदस्य यांनी देखील प्रशासनास मदत केली.

Protected Content