पुण्यात सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आचारसंहिता भंगाच्या १५०५ तक्रारी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात घेण्याचे भारत निवडणूक आयोगाचे मुख्य उद्द‍िष्ट आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूकीत आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि त्याचा मागोवा घेण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सी-व्हिजिल ॲपला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्या माध्यमातून दाखल होणाऱ्या तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्हा स्तराव लक्ष केंद्रीत आहे.

यासंदर्भात पुणे जिल्हयात सी- व्हिजील ॲपच्या माध्यमातून १५ मार्चपासून आजपर्यंत आचारसंहिता भंगाच्या १ हजार ५०५ तक्रारी आढळल्या आहेत. यातील १ हजार ३२९ तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. उर्वरीत १७६ तक्रारी कारवाई न करता वगळयात आल्या आहे. ही माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाने दिली आहे.

Protected Content