भाजीपाला व फळविक्री ओट्यांच्या लिलावास स्थगिती ; व्यापाऱ्यांकडून जल्लोष

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा परिषदेने जळगाव येथील गोलाणी मार्केटच्या धर्तीवर तीन मजली व्यापारी संकुल बांधुन त्यातील भाजीपाला व फळ विक्रीसाठी ओट्यांच्या लिलावास स्थगिती मिळाल्याने व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष केला आहे. 

पाचोरा परिषदेने जळगाव येथील गोलाणी मार्केटच्या धर्तीवर तीन मजली व्यापारी संकुल बांधुन त्यातील भाजीपाला व फळ विक्रीसाठी ओटे लिलावा दि. ४ नोव्हेंबर २०२० ते ६ नोव्हेंबर २०२० या कालावधीत दुकाने व फळभाज्या विक्री ओटेचा लिलाव केला होता. मात्र यावेळी एकही भाजीपाला व फळ विक्रेता लिलावात सामिल न झाल्याने लिलावास स्थगिती देण्यात आली होती.

 मात्र नगरपरिषदेने दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी पुनःच्छ जाहिर लिलाव करण्याचे धोरण आखुन तळ मजल्यावरील १४२ ओट्यांचा लिलाव करण्याची योजना हाती घेतली असतांनाच उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष प्रियंका वाल्मिक पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरद पाटे सह अधिकारी, कर्मचारी उपस्थित असतांनाच भाजीपाला व फळ विक्रेता असोसिएशनने उपविभागीय अधिकारी व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देवुन लिलाव स्थगित करण्यास भाग पाडले. ओट्यांच्या लिलावास स्थगिती मिळाल्यानंतर व्यापाऱ्यांनी त्याच ठिकाणी फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. 

पाचोरा नगरपरिषदेने ७ डिसेंबर २०२० मध्ये विशेष सभा घेऊन ठराव क्रंमाक ४६ नुसार पाचोरा येथील प्रस्थापित भाजीपाला व फळ विक्रेत्यांनाच जाहिर लिलावात भाग घेण्या सदंर्भात अटी, शर्ती घालुन दिल्या होत्या. मात्र असे असतांना पहिल्याच दिवशी बाहेरील ५४ लोकांनी २५ हजार रुपये अनामत रक्कम देवुन लिलावात सहभाग घेतला होता. 

भाजीपाला व फळ विक्रेत्यांची परिस्थिती नाजुक असल्याने त्यांचेसाठी केवळ १० हजार रुपये अनामत रक्कम ठेवावी. व २५ हजार रुपये किंमतीत ओटा द्यावा अशी मागणी केली असुन दि. १८ फेब्रुवारी रोजी होणारा लिलाव रद्द करण्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष शेख सलिम शेख नईम, उपाध्यक्ष भरत चौधरी, सचिव अखिल गफ्फार, नगरसेवक रफिक बागवान, माजी नगरसेवक आयुब बागवान, वसिम रईस, वसिम बागवान, अजिज बागवान, जितु महाजन, रवी भाई, अशोक रामचंद्र यांचेसह ७० ते ८० व्यापाऱ्यांनी ओट्यांचा लिलाव स्थगित ठेवण्यासाठी गोंधळ घातला. व लिलाव स्थगित झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.

 

Protected Content