राज्यसभेतील विजयानंतर भाजपच्या भुसावळात आनंदोत्सव

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तीन उमेदवारांना घवघवीत यश मिळालेल्या भुसावळ शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत असून प्रामुख्याने भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळत व आ.संजय सावकारे यांनी लाडू वाटप करत जल्लोष साजरा केला आहे.

काल राज्यसभेचे निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिन्ही उमेदवारांना घवघवीत यश मिळालं. यामुळे भुसावळ तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रामुख्याने महिला कार्यकर्ते यांनी भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन समोर फुगड्या खेळत लाडू वाटप करत, एकच जल्लोष साजरा केला आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय सावकारे बोलताना म्हणाले की, आमची प्रामुख्याने सर्व आमदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जो निर्णय झाला होता. त्या निर्णयाला सर्वांनी एक मताने दुजोरा दिल्यामुळे हा आमचा विजय ठरला आहे.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!