बहिणाबाई चौधरी विद्यापीठात कार्यगौरव पुरस्काराचे वितरण

vidyapith purskar

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी व उत्कृष्ट विद्यार्थी स्वयंसेवकांना शुक्रवारी, २९ नोव्हेंबर रोजी कार्यगौरव पुरस्कार वितरित करण्यात आले.

कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. यावेळी केशव स्मृती प्रतिष्ठानचे सचिव, रत्नाकर पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य, दिलीप पाटील, प्रा.नितीन बारी हे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रासेयो स्वयंसेवक कार्यदिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. रत्नाकर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगीतले की, सेवेचा वसा हा आपल्या कृतीतून प्रदर्शीत व्हावा. सामाजिक परिवर्तनाचा रथ रासेयोच्या माध्यमातून पुढे न्यावा. समाजातील समस्या रासेयो स्वयंसेवकांनी जाणून समाजामध्ये परिवर्तन घडवून आणावे. दिलीप पाटील यांनी सांगीतले की, युवाशक्तीच्या मनाला साद घातली तर अनेक विधायक कार्य करता येतात. रासेयो कार्यक्रम अधिकाऱ्यांनी स्वयंसेवकातील सुप्त गुण ओळखावेत. प्रा.नितीन बारी यांनी स्वयंसेवाकांना उद्देशून सांगितले की, तुमच्यातील कौशल्य रासेयोच्या माध्यमातून काम करतांना उपयोगात आणावे. अध्यक्षीय समारोप करतांना कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी रासेयोच्या माध्यमातून विधायक काम व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दिपक सोनवणे यांनी केले. प्रास्ताविक रासेयो संचालक डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी केले. प्रा. माधव कदम यांनी आभार मानले. पुरस्कारार्थी प्राचार्य , डॉ.मनोहर पाटील, डॉ.कांचन महाजन व कांचन चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

पुरस्कार विजेते पुढील प्रमाणे विद्यापीठस्तरीय महाविद्यालयीन रासेयो एकक उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार जळगाव जिल्ह्यासाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव, धुळे जिल्ह्यासाठी एस.एस.व्ही.पी.एस.चे डॉ.पी.आर.घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे तर नंदुरबार जिल्ह्यासाठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठस्तरीय रासेयो कार्यक्रम अधिकारी उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार जळगाव जिल्ह्यातून डॉ.कांचन महाजन, कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धरणगाव, धुळे जिल्ह्यातून डॉ.दत्ता ढाले, एस.एस.व्ही.पी.एस.चे डॉ.पी.आर.घोगरे विज्ञान महाविद्यालय, धुळे , नंदूरबार जिल्ह्यातून डॉ.नामदेव गजरे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रूपये १०००/- देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठस्तरीय रासेयो स्वयंसेवक उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार जळगाव जिल्हयातून कांचन चव्हाण, समाजशास्त्र प्रशाळा, समाजकार्य विभाग,कबचौउमवि,जळगाव, धुळे जिल्ह्यातून गणेश उफाडे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय, मोरणे,जि.धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून अनिल गावित, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नवापूर,जि.नंदूरबार यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रूपये ५००/- देऊन गौरविण्यात आले.

सकाळी झालेल्या कार्यशाळेत जैवविविधता व्यवस्थापन समिती (बीएमसी) व नोंदवही (पीबीआर) यावर डॉ.के.एस.विश्वकर्मा यांनी तर डॉ.संजय पहुरकर यांनी रेडरिबन क्लब व एड्स जगजागृती अभियानाबाबत मार्गदर्शन केले. डॉ.विवेक काटदरे यांनी हिशोब तपासणीबाबत मार्गदर्शन केले.

Protected Content