धावत्या रेल्वेच्या धक्क्याने तरूणाचा मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । खंडेराव नगरातील तरूणाचा रेल्वेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. याप्रकरणी रेल्वे पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सोमनाथ गोकुळ जगताप (वय-२६) रा. साईबाबा मंदीराजवळ खंडेराव नगर असे मयत तरूणाचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, सोमनाथ जगताप हा सेन्टींग काम व हातमजूरीचे मिळेल ते काम करून आई व त्याचा उदरनिर्वाह करतो. आज सोमवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास तो कामावरून घरी जेवणासाठी आला होता. जेवन करून पुन्हा कामावर जात असतांना रेल्वे पटरी क्रॉस करत होता. त्यात धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने सोमनाथ जागीच ठार झाला. ही घटना रेल्वे खंबा क्रमांक ४१६, ९/११ जवळ घडली. त्याच परिसरातील रहिवाशी असल्याने तरूणांनी त्याला ओळखले. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला आहे. मयताच्या लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि राजू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रविण राजगुरे करीत आहे. मयताच्या पश्चात आई कमलबाई भाऊ एकनाथ जगताप असा परिवार आहे. 

Protected Content