Home Cities जळगाव डॉ. अजय कोगटा यांचा भाजपमध्ये प्रवेश

डॉ. अजय कोगटा यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
124

जळगाव प्रतिनिधी । येथील ख्यातनाम अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अजय कोगटा यांनी आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश घेतला.

शहरातील सुप्रसिध्द अस्थिरोग तज्ज्ञ तथा पाठीच्या मणक्याचे सर्जन डॉ. अजय कोगटा यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. जामनेर येथील आज झालेल्या ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पीटलच्या उदघाटनानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री तथा विधानपरिषदेतील विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत डॉ. कोगटा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील यांच्यासह भाजपचे मान्यवर नेते उपस्थित होते.


Protected Content

Play sound