आसोदा येथे विद्यूत रोहित्राला अचानक आग

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आसोदा येथे विद्युत रोहित्राला अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण रोहित्र खाक झाले आहे. दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज महावितरणच्या कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे.

जळगाव असोदा रोडवर हॉटेल आर्यासमोर विद्युत रोहित्र आहे. त्याला आज मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. याच परिसरात  महावितरणचे असोदा सबस्टेशनचे कर्मचारी वास्तव्यास आहेत. प्रकार कळाल्यानंतर महावितरणचे कर्मचारी विजय पाटील, विजय जाधव, काशिनाथ कोळी, भीमचरण इंगोले, विनोद पाचतोळे , शत्रुघ्न  कोळी या कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठले. याच वेळी पंचायत समिती सदस्य तुषार महाजन यांच्यासह शिवसेनेचे सचिन चौधरी ललित बाविस्कर सुरेश भोळे यांनीही घटनास्थळ गाठले व संबंधित आगीची माहिती जळगाव येथील अग्निशमन विभागाला दिली. मिळालेल्या माहितीनुसार अग्निशमन बंबाने आसोदा गाठले. कर्मचारी संतोष तायडे रोहीदास चौधरी हिरामण बाविस्कर यांनी पाण्याचा फवारा करत आग विझविली. दरम्यान घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. या आगीत पूर्ण रोहित्र  व केबल खागुण दीड लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज महावितरणच्या कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे.

 

Protected Content