यावलमध्ये शेरो-शायरीची मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध


यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात शनिवार रात्री शेरो-शायरीच्या चाहत्यांसाठी अविस्मरणीय अशी रात्र ठरली. रहेनुमा स्पोर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटीच्या वतीने हाजी हकीम हॉल येथे आयोजित ‘एक शाम अतुल पाटील के नाम’ ऑल इंडिया मुशायरा कार्यक्रमात देशभरातील प्रसिद्ध कवींनी आपल्या अद्वितीय रचनांद्वारे उपस्थित श्रोत्यांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. पहाटे चारपर्यंत सुरू असलेल्या या साहित्यिक सोहळ्याला यावल शहरासह परिसरातील नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सावदा येथील डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष अल्हाद डॉ. हारून शेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जळगावचे माजी महापौर अब्दुल करीम सालार, फारुख मनियार, हाजी शब्बीर खान, हाजी मुस्तफा खान, कदिर खान, करीम मानियार, मुस्ताक शहा, माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, यावल नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शेख असलम नबी, हाजी गफ्फारशाह आणि फारुख मण्यार हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

मुशायऱ्यात देशभरातून आलेल्या नामांकित कवींनी सहभाग घेतला. कवि रागीब ब्यावली, अर्षद सिद्धार्थ नगरी, अकिल अहमद, कुणाल दानिश नागपूर, जहीर अख्तर मालेगाव, अशफाक ताज खंडवा, हबीब मंजर, बिलाल यावल, सुब्हान राज, अकबर ताज खंडवा, ‘वाह वाह क्या बात है’ टीव्ही फेम कवि मुजावर मालेगाव, न्याज कशिष अमरावती, नदीम मिर्झा जळगाव, हास्यकवी शाहिद मुहफट, नौशाद ब्यावली आदींनी आपल्या कवितांमधून श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श केला. त्यांच्या प्रत्येक शेरावर प्रेक्षकांच्या “वाह वाह” च्या घोषणा दुमदुमत राहिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रहीस अहमद खान यांनी केले, तर मुशायऱ्याचे संचालन इर्शाद अंजुम (मालेगाव) यांनी केले. काव्यप्रेमींच्या उत्साही सहभागामुळे हा कार्यक्रम पहाटेपर्यंत सुरू राहिला.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा संस्थेच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. तसेच कवी रागीब ब्यावली यांच्या ‘थोडी मिट्टी और कुरेद’ या उर्दू काव्यसंग्रहाचे प्रकाशन जळगाव येथील ईकरा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व माजी महापौर अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते संपन्न झाले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी रहेनुमा स्पोर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. इसरार खान, अब्दुल समद अब्दुल वाहेद, शरीफ खान, शेख फारुख, सय्यद इमरान, रईस खान, अय्युब खान, सय्यद अशफाक, यासीन खान, अफजल खान, शेख इरफान आणि इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.

यावलच्या सांस्कृतिक वातावरणात उर्दू साहित्याचा अनोखा सुगंध पसरवणाऱ्या या मुशायऱ्याने प्रेक्षकांच्या मनावर अमिट ठसा उमटवला.