जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथे आयोजीत वीर गुर्जर क्रिकेट लीगच्या अंतीम सामन्यात चोपडा येथील अथर्व ट्रॅव्हल्स च्या संघाने ॲड.विनोद पाटील यांच्या वंदे मातरम संघाचा ८ गडी राखून विजय मिळवत, स्पर्धेच्या पहिल्या वर्षाचे विजेतपद मिळवले आहे. तर वंदे मातरम संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंतीम सामन्याचा सामनावीर अथर्व ट्रॅव्हल्स गोलु देशमुख हा ठरला.

वीर गुर्जर क्रिकेट लीगचे आयोजन ३० ते २ फेब्रुवारी दरम्यान चोपडा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण १६ संघांनी सहभाग घेतला होता. अंतीम सामन्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंह पाटील, दिशा ऑटो लींक चे संचालक अजय सुभाष पाटील, ॲड.विनोद पाटील, माजी नगरसेवक राजाराम पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नंदकिशोर पाटील, रामचंद्र देशमुख, डॉ.राहुल पाटील, कवी प्रफुल्ल पाटील, आडगाव माजी सरपंच रावसाहेब पाटील, विशाल पाटील, ललित पाटील, डॉ.सत्वशील जाधव, समाधान पाटील, सावखेड्याचे सरपंच जितेंद्र पाटील, महेश पाटील, विपीन चौधरी, अमित पाटील, अशोक जाधव यांच्यासह चोपडा तालुक्यातील अनेकजण उपस्थित होते. या स्पर्धेचा सर्वोत्तम फलंदाज वंदे मातरम संघाचा हर्षवर्धन चौधरी हा खेळाडू ठरला. तर सर्वोत्तम गोलंदाज वंदे मातरम संघाचा शशांक पाटील हा ठरला. स्पर्धेचा मालिकावीराचा पुरस्कार अथर्व ट्रॅव्हल्सच्या कल्पेश चौधरी याने मिळवला. या स्पर्धेचे तिसरे पारितोषीक ऋषी कॉम्युटर व क्वॉलीटी मेटल्स या संघांना विभागून देण्यात आले. तर स्पर्धेत खेळाडूवृत्ती दाखविणारा उत्तम संघ म्हणून देण्यात येणारे पारितोषीक ऋषी कॉम्युटर संघाला देण्यात आले.