जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकात दाम्पत्याच्या कारला जोरदार धडक महिलेच्या पतीसोबत हुज्जत घातली त्यानंतर महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना रविवारी २ फेब्रुवारी रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दुसऱ्या कारमधील अनोळखी चार ते पाच जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील समर्थ कॉलनी परिसरातील एका भागात ४१ वर्षीय महिला आपल्या पतीसह वास्तव्याला आहेत. रविवारी २ फेब्रुवारी रेाजी महिला ह्या आपल्या पतीसोबत कारमधून शहरातून स्वातंत्र्य चौकातून जात असतांना मागून येणारी कार क्रमांक (एमएच २३ ई ३३०३) ने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे महिलेचे पती यांनी याबाबत जाब विचारला. याचा राग आल्याने कारमधील अज्ञात चार ते पाच जणांनी हुज्जत घातली. त्यानंतर महिलेचा हात पकडून विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने सोमवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारमधील अज्ञात चार ते पाच जणांविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहे.