खा. सुनेत्रा पवार यांच्यावर राज्यसभेत देण्यात आली महत्त्वाची जबाबदारी

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांची तालिका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. पहिल्याच टर्ममध्ये त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तालिका अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी एक्स पोस्टद्वारे त्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले, “राज्यसभेतील चर्चेला योग्य दिशा देणे, संसदीय कामकाजाची शिस्त कायम राखणे आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडणे यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या ‘तालिका अध्यक्ष’ पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व नवीन जबाबदारीसाठी शुभेच्छा!

Protected Content