मुक्ताईनगर प्रतिनिधी । मुक्ताईनगर कृषी उत्पन्न बाजार समिती, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा असून याठिकाणी अंदाजपत्रकानुसार कामे होत नसून मनमानी पद्धतीचा अवलंब केला जात आहे. याची वरिष्ठ पातळीवरून तसेच स्थानिक आमदार व खासदार यांनी लक्ष देवून कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीची उपशाखा मुक्ताईनगर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून असल्याने या ठिकाणी गेल्या वर्ष झाले. गाळे बांधकामाचे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात गाडे बांधकामाची निविदा दैनिकात प्रसिद्ध करण्यात आली. तीही पाच गाडे बांधकामाची परंतु अस्तित्वात मात्र दुमजली करून दहा गाळे बांधण्यात आले. रंगरंगोटी करून शटर लावून काम पूर्ण झाले. तसेच त्याचं ठिकाणी दुसऱ्या बाजूला आता अकरा गाळे बांधकाम सुरू आहे व तेही आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु या समितीमधील सदस्य तसेच अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार इतक्या शिगेला पोचला की ई टेंडरची जाहिरात दिवशी प्रसिद्ध झाली. तसेच 14 ऑगस्ट 2021 रोजी या टेंडरची अनामत रक्कम भरण्यात आली परंतु त्याआधीच ठेकेदार शोधून त्याला काम दिले जाते व त्याचे ठेकेदाराकडून लिंटर लेव्हल बांधकाम पूर्ण केले जाते कोणाच्या आदेशाने होते हे तपासणे मात्र गरजेचे आहे. तसेच बांधकाम होत असलेल्या गाड्यांची परवानगी व जाहीर झालेली निविदा मात्र पाचच गाड्यांची असताना सदर ठिकाणी मात्र 11 गाळे बांधकाम व त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत आहे कोणाच्या सहर्ष आशीर्वादाने एवढा भोंगळ कारभार सुरू आहे असा ही प्रश्न होत आहे.
काय आहे घोटाळा
कृषी उत्पन्न बाजार समिती उप मुक्ताईनगर रोड या ठिकाणी पहिल्या टप्प्यात घेण्यात आलेल्या गाळे बांधकाम परवानगी पाच गाड्यांची परंतु त्याच ठिकाणी दुमजली बांधून दहा गाळे बांधण्यात आले. तसेच दुसऱ्या टप्प्यात मागणी करण्यात आलेली पाच गाळे बांधकामचे तसेच या ठिकाणीदेखील 11 गाळे बांधकाम सुरू आहे. दोन्ही टप्प्यातील बांधकाम हे एकाच ठेकेदाराकडून करत असल्याचे माहिती यावेळी मिळाली. परंतु नगरपंचायत तर्फे घेण्यात आलेल्या परवानगीच मात्र दुमजली चा उल्लेख नसून दोन्ही साईड ने 5 आणि दहा पंधरा गाड्या बांधकामाची परवानगी दिली असल्याने हा भोंगळ कारभार सर्वांच्या निदर्शनास असून मोठ्या आर्थिक व्यवहाराने तर अधिकाऱ्यांची खिसे गरम झाले नाही ना असे परिसरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहे.
गरीब त्रस्त परंतु अशा ठिकाणी नगरपंचायत सुस्त का?
एखाद्या गोरगरीब नागरिकाला जर बांधकाम झालेले असले किंवा करावयाचे असले तर नगरपंचायत नानाप्रकारच्या दाखले व उतारे मागते तसेच बांधकाम सुरू केले तर त्यावर गुन्हा दाखल करून जास्तीचा कर भरावयाचे लावते परंतु या ठिकाणी नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी यांना माहिती असताना देखील परवानगी मागण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये गोड तर नाही ना असे न पाहता परवानगी दिली तेही एक मजली परंतु बांधकामाच्या ठिकाणी झालेले बांधकाम दुमजली पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर असून डोळेझाक का काही आर्थिक व्यवहार तर झालेला नाही ना असे संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.