वन विभागाच्या पथकाचा दणका : पाच लाखांचे चोरीचे लाकूड जप्त

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील वन विभागाच्या गस्ती पथकाने केलेल्या धडक कारवाईत पाच लाख रूपये मूल्याचे चोरीचे लाकूड तसेच वाहन जप्त करण्यात आले आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, दिनांक २ जानेवारी रोजी यावल च्या वन विभागाला मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनपाल गस्ती पथक व रेंज स्टाफ यावल पश्चिम सह शासकीय वाहनाने नायगाव किनगाव मार्गावरील रस्त्यावर गस्त घालत होता. दरम्यान, किनगाव कडे जात असतांना बोलेरो पीक अप संदिग्ध वाहन भरधाव वेगाने जात असता त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालक वाहन सोडून अंधारात फ़रार झाला.

सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात खैर प्रजातीचे लाकूड मिळून आले. वाहन जप्त करून शासकीय विक्री आगार यावल येथे आणून जमा करण्यात आले आहे. जप्त माल महिंद्रा बोलेरो पिकअप चारचाकी वाहन क्रमांक एमएच ०४जी आर५३४३ या वाहनासह त्यात असलेले खैर जातीचे अंदाजे ५.००० घन मीटर लाकूड व वाहन तसेच मालाची बाजार भावा नुसार अंदाजित किंमत पाच लाख रुपये एवढी आहे.

या कार्यवाहीत गस्ती पथकाचे वनपाल आर. बी. थोरात, वाघझिर्‍याचे वनपाल विपुल पाटील वाघझिरा, निंबादेवी येथील वनरक्षक अक्षय रोकडे, मनुदेवी येथील वनरक्षक चेतन शेलार, वाहनचालक योगिराज तेली आणि पोलीस कर्मचारी सचिन तडवी यांनी सहभाग घेतला.

सदरची कार्यवाही ही धुळे येथील वनसंरक्षक हृषिकेश रंजन,जमीर शेख उप वन संरक्षक यावल वनविभाग जळगाव, आर. आर. सदगीर विभागीय वन अधिकारी दक्षता पथक धुळे,प्रथमेश हडपे सहाय्यक वन संरक्षक यावल आणि अजय बावणे वनक्षेत्रपाल गस्ती पथक यावल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

वनक्षेत्रपाल गस्ती पथक यावल यांजकडून जनतेस आवाहन करण्यात येते की, वन व वन्यजीव तसेच अवैधवाहतूक लाकूड संबधित कुठाला गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा

Protected Content