रेल्वे अप्रेंटीस बेरोजगार तरूणांचे एक दिवशीय आंदोलन

 

यावल, प्रतिनिधी । येथील शहरातील गंगा नगर क्षेत्रातील गंगेश्वर महादेव मंदिर परिसराच्या ठिकाणी ९ फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया रेल्वे ऍक्ट अप्रेंटिस असोशियनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांच्या उपस्थितीत यावल शहर तसेच तालुका रेल्वे अप्रेंटिस तरुणांची बैठक घेण्यात आली. बैठकीत दि. १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे एकमताने ठरविण्यात आले.

बैठकीत दि. १२ फेब्रुवारी रोजी ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारत भरातील रेल्वे अप्रेंटिस तरुण हे एक दिवसीय देशव्यापी, धरणें आंदोलन रेल्वेच्या डीआरएम व जीएम ऑफिसच्या समोर करणार आहेत. या आंदोलनाचा मुख्य उद्देश्य रेल्वेबोर्डाने रेल्वे अप्रेंटिस तरुणांबद्दल चुकीचे नियम लागू केल्याने देशातील हजारो तरुण रेल्वे अप्रेंटिस बेरोजगार झाले आहेत. याआधी रेल्वे बोर्ड रेल्वे अप्रेंटिस केलेल्या तरुणांना जी. एम. पावर नियमांनुसार रोजगार द्यायचे कारण रेल्वे अप्रेंटिस तरुण हे रेल्वेचे प्रशिक्षण घेतात. तीन वेळा परीक्षा पास करून एनसीवीटीचे प्रमाणपत्र प्राप्त करतात. यासाठी खूप पैसा व जवळ जवळ दोन ते तीन वर्षाचा कालावधी खर्च करतात. रेल्वेचे काम शिकतात परंतु प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बेरोजगार होतात. सरकारच्या या चुकीच्या धोरणामुळे हजारो युवकांचे भवितव्य हे अंधारात ढकलेले जात आहे. तसेच भारत सरकार ही मोठ्या प्रमाणात रेल्वेचे खासगीकरण करत असल्याने युवकांवर बेरोजगारिची कुऱ्हाड पडणार आहे. सरकारच्या अशा चुकीच्या धोरणाच्या विरुद्ध १२ फेब्रुवारी रोजी AIRF च्या एक दिवशीय आंदोलनात बेरोजगार रेल्वे अप्रेंटिस युवक सहभागी होणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

 

 

 

 

Protected Content