यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील हिंगोणा गावावजवळच्या मोर धरण परिसरात एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की , एक४०वर्षीय महिला या घटनेतील संशयीत आरोपी खुमसिंग सरदार बारेला वय३३ वर्ष ( मुळ राहणार खिरवड तालुका रावेर हल्ली मुकाम मोर धरणाजवळ हिंगोणा ) याच्याकडे आली. तिने खुमसिंग याच्यासोबत राहण्याचा हट्ट केला. मात्र संशयीतने सदर महिलेस सांगीतले की तुझ्यामुळे माझा संसार खराब होइल असे तिला वारंवार बोलुन समजवण्याचा प्रयत्न केला मात्र सदरची महीला ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने संशयीत आरोपी सुमसिंग सरदार बारेला यांने संतापाच्या भरात त्याच्याकडील असलेल्या ब्लेडने सदर त्या अज्ञात महिलेच्या गळ्यावर करून नंतर तिला विहीरीत ढकलुन दिले. हे कृत्य २८ एप्रिल रोजी घडले असले तरी याचा उलगडा आता झाला आहे. सदर महिलेचा मृतदेह विहिरीत आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीला जेरबंद केले आहे.
याबाबत संशयीत आरोपीच्या विरूद्ध फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन , या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत. तर विशेष बाब म्हणजे या गुन्ह्यातील संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. या घटनेतील खुन झालेल्या अज्ञात ४० वर्षीय महीलेची अद्यापपर्यंत ओळख पटलेली नसल्याचे वृत्त आहे .
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.