यावल तालुका विधी सेवा समितीतर्फे शुक्रवारी कायदेविषयक महाशिबिराचे आयोजन

यावल, प्रतिनिधी | यावल तहसील कार्यालयात जिल्हा विधी प्राधिकरण आणि यावल तालुका विधी सेवा समिती व यावल वकील संघातर्फे शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी कायदेविषयक महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या.एम.एस .बनचरे यांनी बुधवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

आयोजित केलेले कायदेविषयक महाशिबीर यावल तहसील कार्यालयात शुक्रवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान होणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायमुर्ती एस.डी. जगमलानी, जिल्हा विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव ए.ए. शेख यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे. शिबीरात विविध प्रकारचे शासकीय कार्यालयात राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांबाबत सर्वसामान्य नागरीकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. यावेळी शासकीय विभागाचे अधिकारीवर्ग राहणार आहे.

महाशिबीर यशस्वी होण्यासाठी विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग, जिल्हा आदीवासी प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे, तहसीलदार महेश पवार, यावल पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर, सहाय्यक गट अविकारी किशोर सपकाळे , नगरपरिषदचे प्रभारी मुख्यधिकारी अविनाश गांगोडे, यावलचे वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रम पदमोर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. धीरज चौधरी, सचिव अॅड. एन. पी. मोरे यांच्या वकील संघाचे सदस्य परिश्रम घेणार आहे. नागरीकांनी शिबीराचा सर्वनागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या.एम.एस .बनचरे यांनी केले आहे .

Protected Content