जळगावकरांवर जलसंकट ; उपमहापौरांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती


84c868fa 28a1 44ac 91b4 ae41c53cb3d5
 

जळगाव (प्रतिनिधी) ऐन उन्हाळ्यात जळगावकरांची पाण्यासाठी वणवण सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासुन महापालिकेने तिन दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने नागरिक वैतागलेले असतांनाच आज सोमवारी अनेक ठिकाणी उशीराने तर काही परिसरात पाणी मिळालेच नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. दरम्यान, भाजपाचे नगरेसवक सचिन पाटील, धीरज सोनवणे यांनी आज महापालिकेत येवून उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांच्याकडे पाण्यासंदर्भात तक्रारी मांडल्या. त्यानतंर सोनवणे यांनी पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांना बोलावून त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

 

सध्या वाघुर धरणात केवळ २० टक्केच पाठीसाठी राहीला आहे. एकंदरीत दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता जळगावकरांच्या पाण्यात कापत करुन दि.१ एप्रिलपासून शहरात तिन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. एकीकडे दोन दिवसाआड मिळणारे पाणी पुरेश्या दाबाने मिळत नसतांना तिन दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने जळगावकर दुहेरी जल संकटात सापडले आहेत. मागील दोन दिवसात वाघुर प्रकल्पावरील वीज जोडणीत बिघाड झाल्याने उशीरा व कमी दाबाने नागरिकांना पाणी देण्यात आले. आज सोमवारी देखील शिव कालनी, गणेश कॉलनी, सिंधी कॉलनी व गणेश वाडी भागात पुरेसे पाणी मिळाले नाही.

 

 

भाजपाचे संतप्त नगरेसवक सचिन पाटील, धीरज सोनवणे यांनी आज महापालिकेत येवून उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांच्याकडे पाण्याच्या तक्रारी मांडल्यात. त्यानतंर सोनवणे यांनी पाणीपुरवठा अभियंता डि.एस.खडके यांना बोलावून त्यांची झाडाझडती घेतली. यावेळी नगरसेवक धीरज सोनवणे यांनी पाणीपुरवठा करण्यात देखिल भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला.यावेळी नगरसेवक सचिन पाटील यांनी शिवकालनीत सुमारे ३०० बेकायदेशीर नळजोडण्याच्या साह्याने पाणी चोरी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याचे सांगीतले. दरम्यान,धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने पंप पूर्ण क्षमतेने पाणी उपसा केला जात नसल्याने शहरातील उंच टाक्‍या पूर्ण क्षमतेने भरणा होत नाही. त्यामुळे शहरातील अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा समस्या निर्माण होत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here