कापुरे परिवारातर्फे वऱ्हाडींना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप

जळगाव, प्रतिनिधी । येथील राजेंद्र वंसत कापुरे यांचा मुलगा चि. विवेक व पळासखैळा मित्राचे ता. जामनेर येथील विलास एकनाथ खैरनार यांची मुलगी चि. सौ. का. सुवर्णा यांचा विवाह दिनांक १४ जुन रोजी लक्ष्मी नगर जळगाव येथे साध्या पध्दतीने साजरा झाला.

चि. विवेक व चि. सौ. का. सुवर्णा यांना विवाह प्रसंगी अखिल भारतीय शिंपी समाज मा युवक अध्यक्ष मनोज भांडारकर यांनी आहेर म्हणून मास्क व सेनॅटाईजर सप्रेम भेट दिले. जळगाव शहर शिंपी समाज हित वर्धक संस्थेतर्फे उपस्थित वऱ्हाडी मंडळीस आर्सेनिक ३० गोळ्या वाटप संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप व का सदस्य प्रशांत कापुरे, दिलीप सोनवणे यांनी केले, याप्रसंगी मुलांच्या वडिलांनी जळगाव शिंपी समाज संस्थेतस कोरोना महामारीसाठी रोग प्रतिकारक आर्सेनिक ३० गोळ्या समाज बांधवांस मोफत उपलब्ध करून देण्यासाठी मुलाचे काका शरद कापुरे यानी संस्थेस २१०० रुपयांचा चेक संस्थेस प्रदान केला व समाजात एक आदर्श निर्माण केला. या विवाहाला भक्त ४० लोक उपस्थित होते. विवाहात सोशल डिस्टनसिंग पालन करण्यात आले होते.

Protected Content