ओबीसी शिक्षक परिषदेच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी

अमळनेर, प्रतिनिधी । संपूर्ण देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ११ एप्रिल महात्मा फुले जयंती घराघरात साजरी होत आहे. ओबीसी शिक्षक परिषदेच्या वतीने महात्मा फुले जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

महात्मा फुले जयंतीनिमित्ताने त्यांच्या व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. महात्मा फुले यांचे कार्य बहुजन समाजासाठी प्रेरणादायी आहे . हंटर कमिशन समोर शिक्षण हे सक्तीचे केले पाहिजे अशी मागणी करणारे पहिले समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले होते. फुले दांपत्य भारतरत्न पुरस्कारापासून वंचित आहेत.  त्यांचे कार्य भारतरत्न पुरस्कारापेक्षा मोठे आहे. भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी ओबीसी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा मागणी केली. फुले दाम्पत्याला महाराष्ट्र शासनाने मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांना आदर्श आदरांजली ठरेल अशी भावना ओबीसी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती ती घरीच उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली यावेळी ज्योती महाजन ,वेदांत माळी ,श्रेयस माळी उपस्थित होते.

Protected Content