अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या – माजी आ. चौधरींची मुख्यमंत्र्यांना पत्राव्दारे मागणी 

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | 2019 मधील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई न मिळाल्याने त्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्राव्दारे केली आहे.

सन 2019 मध्ये झालेल्या अतिवृष्टी 52 गावापैकी 20 गा्वांना शासकीय नुकसान भरपाई मिळाली मात्र अद्याप पर्यंत 32 गावातील शेतकऱ्यांना 35, कोटी 40, लाख एवढी रक्कम अजूनही मिळाली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

यासंदर्भ तालुक्यातील शेतकऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करूनही लोकप्रतिनिधीनी कुंभकर्णी सोंग घेत काना डोळा केल्याचा आरोप केला आहे.जून ते ऑक्टोबर, 2020 या कालावधीतील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्याना नुकसान भरपाई –

राज्यातील अतीवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जून ते ऑक्टोबर, 2020 या कालावधीतील बाधित शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्याचे आदेश ता.15 जुलै 2022 रोजी काढण्यात आले. मात्र अजूनही जून ते ऑक्टोबर 2019 मधील अतिवृष्टी नुकसान ग्रस्त शेतकऱ्याना नुकसान भरपाई मिळाली नसल्याने या पाश्वभूमीवर नुकसान भरपाई देण्यात यावी अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत माजी आमदार शिरीष चौधरी यांनी चर्चा करीत नुकसान भरपाई द्यावी असेही सांगितले.

Protected Content