द्रौपदी मुर्मू यांनी घेतली राष्ट्रपतीपदाची शपथ

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत शपथ घेतली.

भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देऊन सर्वांना आश्‍चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा उभे ठाकले होते. तथापि, मुर्मू यांनी अपेक्षेनुसार दणदणीत विजय संपादन केला. परवाच मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आपल्या पदाचा कार्यभार सोडला, तर काल त्यांना समारंभपूर्वक निरोप देखील देण्यात आला.

दरम्यान, आज सकाळी द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनातून संसद भवनात जाऊन आपल्या पदाची शपथ घेतली. त्यांच्या सोबत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे होते. देशाचे सरन्यायाधिश एन. व्ही. रमण्णा यांनी मुर्मू यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथसिंह आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

Protected Content