कोरोनाबाधीतांसाठी गृह अलगीकरण नाहीच : जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

बुलडाणा, प्रतिनिधी ।   जिल्ह्यात कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागातही कोरोना बाधीत रूग्ण आढळून येत आहे.  हे  रुग्ण गृह अलगीकरणमध्ये न राहता गावात मुक्त संचार करत असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामीण भागात आयसोलेशन सेंटर उभारण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिले आहेत. 

ग्रामीण भागात आयसोलेशन केंद्र उभारून कार्यान्वीत करण्यात आले आहे. कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपायोजनेचा भाग म्हणून शहरी व ग्रामीण भागातील ज्या कोविड बाधीत रूग्णांना लक्षणे जाणवत नाहीत. त्यांना गृह अलगीकरण हा पर्याय न देता त्यांना सोयीस्कर अशा संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही स्वरूपात गृह अलगीकरण राहण्याकरीता परवानगी देण्यात येवू नये. जेणेकरून कोविड बाधीत रूग्णांपासून इतरांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एस. रामामूर्ती यांनी दिले आहे.

 

Protected Content