प्रशासनाने नियोजन करावे – अतिक्रमणधारकांची मागणी (व्हिडिओ)

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील महात्मा फुले व्यापारी संकुलात महापालिका प्रशासनातर्फे अतिक्रमण हटविण्यात आले. तर अतिक्रमणधारकांनी आपल्याला व्यवसाय करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याची मागणी केली आहे.

 

आज सकाळी १० वाजेपासून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे महात्मा फुले व्यापारी संकुलातील हॉकर्सवर कारवाई करण्यात आली. महापलिकेच्या या कारवाईचा हॉकर्स बांधवांनी निषेध केला आहे. एकीकडे महापालिकेच्या वतीने शहरातील हॉकर्सचे सर्वेक्षण करण्यात येत असतांना दुसरीकडे महात्मा फुले मार्केटमधील हॉकर्सवर कारवाई का करण्यात येत आहे ? महापालिका कशा प्रकारे हॉकर्सचे सर्वेक्षण करेल असा प्रश्न हॉकर्स बांधवांनी उपस्थित केला आहे. कोरोनाकाळात सर्वांची आर्थिक परिस्थिती खालावली असताना आता कुठे उद्योग व्यवसाय सुरळीत होत असतांना महापालिका प्रशासनाने केलेली कारवाई योग्य नसल्याचे मत हॉकर्स संघटनेचे नंदू पाटील यांनी मांडले. तसेच अतिक्रमणधारक कोणताही हप्ता देत नाहीत असा दावा त्यांनी करून हा त्यांच्या विरोधात कट असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच अतिक्रमणधारकांनी आपल्याला व्यवसाय करण्यासाठी प्रशासनाने नियोजन करण्याची मागणी केली आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/458005832824283

 

Protected Content