शिवकॉलनीत सुजाण नागरिकांच्या आग्रहानंतर लावले गेले पत्रे

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शिवकॉलनी येथे अक्षय वधू-वर केंद्रासमोर ते हनुमान मंदिरासमोरील भागात कोरोनाचे चार पॉझिटिव्ह रुग्ण निघाले असताना आरोग्य विभागाच्या बेफिकीरपणामुळे नागरिकांत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही सुजाण रहिवाशांनी ही बाब संबंधित विभागात कळवल्याने आज त्या भागातील दोन ठिकाणी रस्त्यावर आडवे पत्रे लावून कंटेंनमेंट ( प्रतिबंधित झोन ) असा फलक लावल्याने परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे .

याबाबत माहिती अशी की , शिवकॉलनीच्या मुख्य चौकाजवळ असणाऱ्या ‘ अक्षय ‘ केंद्रासमोर मुस्लिमांचे धार्मिक पवित्र मदरसाजवळ एक पेशंट , तर हनुमान मंदिर परिसरात दोन रुग्ण गेल्या पाच सहा दिवसांपासून पॉझिटिव्ह आढळून आले . त्यात एका महिलेचा व एका पुरुषाचा कोरोना या विषाणूजन्य आजाराने दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली आहे, असे असतानाच एका रुग्णाच्या नातेवाईकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घराच्या प्रवेशद्वारावर लावलेले बॅनर झाकून ठेवले होते ते काढण्यात येऊन पत्र्यावर लावण्यात आले आहे. कॉलनीतील नागरिक आता जागरूक झाले असून त्यांनी या भागात पोलीस बंदोबस्त असावा अशीही मागणी केली आहे. दरम्यान कॉलनीत एकामागे एक रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने काहीसे भीतीचे वातावरण असून शुकशुकाट पसरली आहे. गेल्या चार महिन्यांपूर्वी जशी सोडियम हायपो क्लोराईडची व इतर जंतुनाशकाची फवारणी केली होती , तशी पुन्हा करण्यात यावी अशी मागणी जेष्ठ व सुजाण नागरिकांनी केली आहे. या वॉर्डाच्या नगरसेवकाबद्दलही बऱ्याच नागरिकांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. नगरसेवक करतो तरी काय ? असा प्रश्न काहींनी उपस्थित केला. उद्या काही जागरूक नागरिक स्व खर्चाने सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करणार आहेत.

Protected Content