बुलडाणा जिल्ह्यात आज ३१ पॉझिटिव्ह

बुलडाणा प्रतिनिधी । प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण २७९६ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी २७६५ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून ३१ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. 

प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील २१ व रॅपीड टेस्टमधील १० अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून ४११ तर रॅपिड टेस्टमधील २३५४ अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे २७६५ अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :- बुलडाणा शहर : २,  चिखली शहर  : २, चिखली  तालुका : पेठ १, इसरूळ १, बेराळा १, सवना २,  नांदुरा शहर  : ८, नांदुरा  तालुका  : खेडगाव  १,   मोताळा तालुका : पुन्हई  १,  संग्रामपूर तालुका : कोलद १, खामगांव शहर : १,  दे. राजा तालुका : भिवगण १, पोखरी  १, जळगाव जामोद शहर : १,  मेहकर  शहर  : ५,  मेहकर तालुका : गांगलगाव १,  परजिल्हा रस्ताळा  ता. जाफ्राबाद  १  संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत.  अशाप्रकारे जिल्ह्यात ३१ रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान स्त्री रूग्णालय, बुलडाणा येथे कोलवड  ता. बुलडाणा  येथील ५९ वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 

तसेच आज ५१ रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

तसेच आजपर्यंत ५६३८५१ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत ८५७६७ कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या  ८५७६७ आहे.  आज रोजी १३३८ नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल ५६३८५१ आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण ८६५१५ कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी ८५७६७ कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात ८९ कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 659 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 

Protected Content