चोपडा प्रतिनिधी । चोपडा तालुका व शहर कॉंग्रेसच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
काँग्रेस शहराध्यक्ष के.डी. चौधरी सर यांनी 26 जून 2021 रोजी सुरुवातीला गांधी चौकात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना के .डी .चौधरी यांनी काँग्रेस पक्ष संविधानाचे रक्षण करण्यास कटिबद्ध असून संविधानाची मोडतोड करणाऱ्या मोदी सरकारचे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नसल्याने प्रतिपादन केले. यावेळी छत्रपति शाहूजी महाराज यांची न्यायाची भूमिका विषद करत काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय देण्याच्या भूमिकेत असल्याने ज्या ज्या घटकांवर मोदी सरकार अन्याय करीत आहे त्या घटकांच्या मागे, मग ते शेतकरी असतील, शेत मजूर असतील, विद्यार्थी असतील ,कर्मचारी असतील ,या सर्वांच्या पाठीमागे काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून त्यांना पूर्णपणे न्याय देण्यासाठी लढा देण्याची तयारी काँग्रेस पक्षाची आहे. काँग्रेसचे नेते यासाठी कटिबद्ध असून, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोदी सरकार चे पितळ उघडे पाडल्याशिवाय राहणार नाही .यासाठी गावागावात गल्लीगल्लीत जाऊन जनजागृती करण्यात येईल असे प्रतिपादन करण्यात आले.
यावेळी तापी सहकारी सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील ,इलियास पटेल, देवकांत चौधरी ,जितेंद्र चौधरी, किरण सोनवणे ,कांतीलाल सनेर ,मंगेश भोईटे ,फातिमा बी पठाण, हमीद खा पठाण, आदी कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शाहू महाराज की जय हो, जय जवान जय किसान, भारत माता की जय, अशा गगनभेदी , घोषणा देऊन सामाजिक न्याय दिवस साजरा करण्यात आला.