तबलिगी जमातला बदनाम करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । कोरोनाबाबत वृत्तांकन करतांना काही वाहिन्या या तबलिगी समुदाय व मुस्लीम धर्मियांच्या भावना दुखावत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी येथील एका शिष्ट मंडळाने निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

याबाबत वृत्त असे की, कोरोनामुळे संपूर्ण देशात २१ दिवसांचा लॉक डाऊन सुरू असून, अशा कठीण प्रसंगी हजरत निजामुद्दीन मरकज मुस्लिम समाजाचा तबलीक जमातचा धार्मिक कार्यक्रमासाठी काही नागरिक दिल्ली येथे अडकले होते. परंतु, काही प्रसार माध्यमे दररोज तबलीग जमात व मौलाना साद साहब यांच्या बद्दल अत्यंत अपमानास्पद बदनामी करीत असल्याने अश्या प्रसार माध्यमावर कडक कार्यवाही करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन येथील शिष्टमंडळाच्या वतीने फैजपूर पोलीस स्टेशनला देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, तबलीग जमातच्या धार्मिक कार्यक्रमासाठी काही नागरिक दिल्ली येथे अडकले होते. परंतु, काही प्रसार माध्यमातून दररोज तबलीग जमात बद्दल व मौलाना साद साहब यांच्या बद्दल अत्यंत अपमानास्पद बदनामी करीत चुकीचे शब्दाचा वापर करीत आहे.
कोरोना जिहाद, तालिबानी, आतंकवादी, विरुधी कृती करणारे असे दर्शवण्याचे काम तबलीक जमात करीत आहे. यात अतिशय आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात येत आहे. संपूर्ण मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे व धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न काही प्रसार माध्यम करीत आहे. अश्या प्रसार माध्यमांच्या अँकर व एडिटर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे. अश्या मागणीचे निवेदन फैजपूर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे यांना देण्यात आले. या निवेदनावर नगरसेवक शेख कुर्बान, कलीम खा मण्यार, कौसर अली, शकील शेख, आवेश भांजा, अलीम सौदी आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content