जळगाव,भुसावळ आणि अमळनेरात ७ ते १३ पर्यंत लॉकडाऊन !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हयातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्र या ठिकाणी दि. ७ जुलै च्या पहाटे ५ वाजेपासून ते १३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढले आहेत.

 

जळगाव जिल्ह्यात विशेषत: जळगाव,भुसावळ आणि अमळनेरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याच अनुषंगाने लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनांकडून गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनची मागणी समोर येत होती. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्र या ठिकाणी दि. 7 जुलै च्या पहाटे 5 वाजेपासून ते 13 जुलैच्या रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. यात औषधी दुकाने, दुधविक्री, खरेदी विक्री, हे केवळ रहिवास असणार्‍या रहिवास असणार्‍या प्रभागातच करता येणर नाही. कोणत्याही स्वंयचलित वाहनाचा या कालावधीत वापर करता येणार नाही.

सदरच्या लॉकडाऊन कालावधीत जळगाव जिल्हयातील जळगांव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात केवळ खालील बाबी लागू राहतील.

 

1) सर्व औषधी दुकाने (मेडीकल स्टोअर्स), दुध विक्री व खरेदी व्यवहार / केंद्रे सुरु राहतील. तथापि नागरिक / व्यक्ती यांना केवळ त्यांचा रहिवास असणा-या प्रभागाच्या परिघातच वरीलप्रमाणे खरेदी / विक्रीचे व्यवहार करता येतील. तसेच औषधे, दुध यांच्या खरेदीसाठी कोणत्याही व्यक्ती / नागरिक यांना कोणत्याही स्वयंचलीत वाहनांचा (उदा. दुचाकी/तीनचाकी / चारचाकी) वापर अनुज्ञेय असणार नाही.

 

2) कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगांव, कृषी उत्पन्न बाजार समिती, भुसावळ व कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर येथे केवळ ठोक / घाऊक खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु राहतील. कोणत्याही प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये किरकोळ खरेदी विक्री करणा-या व्यक्ती/नागरिक यांना प्रवेश असणार नाही. तसेच सर्व व्यवहार हे नियंत्रित पध्दतीने पार पाडले जातील व त्या ठिकाणी मास्क, सॅनिटाईजरचा वापर केला जाईल याची दक्षता घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांची राहील. त्याचबरोबर सदर ठिकाणी नागरिकांची अनावश्यक गर्दी होणार नाही व सर्व व्यवहार सुरळीतपणे / नियंत्रितपणे पार पाडले जातील याचे सनियंत्रण जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था जळगांव यांनी करावे.

 

3) केवळ Serious Medical Emergency असेल किंवा तज्ञ डॉक्टरांच्या उपचाराची गरज असेल (रहिवासाच्या प्रभागात उपलब्ध नसल्यास) तरच संबंधित व्यक्ती/नागरिक यांना प्रभागाच्या बाहेर जाता येईल.

 

4) जळगाव जिल्हयातील जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात रहिवास करणारे व ज्यांची शेती नमूद क्षेत्राच्या बाहेर आहे, अशा शेतक-यांना केवळ शेतीविषयक कामे करण्यासाठी, शेतीसाठी लागणारी औषधे, बी-बियाणे, किटकनाशके, खते खरेदी करण्यासाठी संबंधित क्षेत्राच्या बाहेर ये-जा करता येईल. तथापि संबंधितांना त्यांच्या शेतीचा 7/12 उतारा सादर करणे आवश्यक राहील.

 

5) वर नमूद केलेल्या बाबी वगळता जळगाव जिल्हयातील जळगांव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रातील सर्व सेवा, सर्व आस्थापना, सर्व दुकाने (किरकोळ व होलसेल दोनही), सर्व प्रकारचे उद्योग व कंपन्या (एमआयडीसी वगळून), सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंदच राहतील.

 

6) अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ठ असणारी शासकीय / निमशासकीय कार्यालये सुरु राहतील. उदा. आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महसूल विभाग, अग्निशमन विभाग, एमएसईबी, महानगरपालिका व नगरपालिका कार्यालये, बँका, वित्तीय संस्था व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कार्यालये, तथापि सर्व शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.

7) जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्र, भुसावळ नगरपालिका क्षेत्र व अमळनेर नगरपालिका क्षेत्रातील पेट्रोल / डिझेल पंप चालक / मालक यांनी केवळ वर प्रमाणे सूट देण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी / कर्मचारी , अॅम्ब्युलन्स, कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर अधिग्रहीत करण्यात आलेली शासकीय वाहने यांना संबंधितांचे शासकीय ओळखपत्र पाहून पेट्रोल / डिझेल विक्री करावे. तसेच वर नमूद मुद्दा क्रमांक 01 ते 05 मध्ये नमूद केलेल्या बाबींसाठी आवश्यक असणा-या व्यक्तींनाच पेट्रोल/डिझेल विक्री करावी.

8) सदर लॉकडाऊन कालावधीत उक्त नमूद क्षेत्रातील लग्न समारंभ हे 50 व्यक्तींच्या मर्यादेच्या अधिन राहूनच नियंत्रित पध्दतीने पार पाडले जातील. तथापि याबाबतची पूर्व सूचना संबंधितांनी स्थानिक प्रशासन व स्थानिक पोलीस स्टेशन यांना देणे बंधनकारक राहील. तसेच 20 लोकांच्या मर्यादेच्या अधिन राहून अंत्यविधी पार पाडता येईल.

 

Protected Content