Home आरोग्य पाळधीत आज पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह !

पाळधीत आज पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह !

0
118


धरणगाव (प्रतिनिधी) आज दुपारी आलेल्या अहवालानुसार तालुक्यातील पाळधी खुर्द येथे पुन्हा २ नवीन कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दुजोरा दिला आहे.

 

आज दुपारी आलेल्या रिपोर्टनुसार पाळधी खुर्द येथे पुन्हा २ नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत. या वृत्ताला नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, दुसरीकडे संबंधीत बाधित रूग्णांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येत असून परिसरात फवारणी करण्यात येत आहे. तालुक्यातील आजवर आढळून आलेल्या कोरोना बाधीतांची एकूण संख्या १८५ इतकी झाली आहे. यातील १६ जण मयत झालेत आहेत. तसेच आतापर्यंत १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजरोजी कोविड सेंटरला ४२ रुग्ण उपचार घेत आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound