आणखी किती दिवस लॉकडाऊन वाढवणार ; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका


पनवेल (वृत्तसंस्था)
राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. आता आणखी किती दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे?, असा सवाल विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

 

देवेंद्र फडणवीस आज पनवेल आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना फडणवील म्हणाले की, पनवेल जिल्हा उपरुग्णालयाची क्षमता आता संपली आहे. पनवेलचा कोरोना संक्रमणचा दर ४५ टक्के होता आणि त्याच वेळी देशाचा संक्रमनाचा दर ६.४ टक्के होता. त्यामुळे येथे टेस्टिंग वाढवण्याची आवश्यकता आहे. राज्य सरकारकडून महापालिकांना कोविड-19 करीता एका नया पैशाची मदत करण्यात आली नाही, असा घणाघाती आरोप देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. लॉकडाऊनमुळे पोलिसांवर ही विनाकारण भार वाढत आहे. पोलिस आणि नागरिकांमध्ये संघर्ष उभं राहणार नाही, अशी व्यवस्था उभी केली पाहिजे. आताच्या परिस्थितीत लोकांना कोरोनाचा धोका समजलेला आहे. पण अनेक नागरिक आवश्यक कामासाठी बाहेर पडतात. गेल्या चार महिन्यांत पोलिस अत्यंत थकलेले आहेत. आपला जीव धोक्यात टाकून पोलिस कर्तव्य बजावत. पोलिस कोविडने मृत्यू झाले एका अर्थाने ते शहीद झाले, असल्याचेही फडणवीस म्हणाले.

Protected Content