भुसावळ तहसील कार्यलयासमोर भाजपचे धरणे आंदोलन

bjp11

भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील शेतकरी कर्ज माफी, महिला अत्याचार तसेच भुसावळ तहसील कार्यालयात रेशनकार्डसाठी होणारी फिरवाफिरव , रेशनकार्ड आॅनलाईन करणे यासह विविध प्रश्नांबाबतीत येथील तालुका आणि शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भुसावळ तहसील कार्यलयासमोर महाआघाडी सरकारच्या विरोधात दि. २५ फेब्रुवारी रोजी, सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत राज्यव्यापी धरणे आंदोलन सुरु झाले आहे.

तालुका आणि शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलनात भुसावळ भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील , सरचिटणीस दिलीप कोळी, प्रशांत पाटील , शहराध्यक्ष दिनेश नेमाडे, सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन यांच्यासह भाजपा नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती पंचायत समिती सदस्य, शक्ति केंद्रप्रमुख , बुथ प्रमुख, तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य, भाजपा कार्यकर्ते व शेतकरी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content