मोदी-शाह आपल्याच कल्पनेच्या दुनियेत जगताय : राहुल गांधी

rahul modi 759

 

केरळ (वृत्तसंस्था) मिस्टर अमित शाह आणि मिस्टर नरेंद्र मोदी हे आपल्याच कल्पनेच्या दुनियेत जगत असतात. त्यांच्या बाहेरच्या जागाशी काही संबंधच नसतो. आपल्याच जगात जगत असताना ते महत्वाच्या गोष्टींबाबतही कल्पना करीत असतात. त्यामुळे देश सध्या या अडचणीच्या काळातून जात आहे, अशा तिखट शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मोदी-शहा जोडीवर निशाणा साधला आहे. देशातील सध्याच्या आर्थिकस्थितीवर भाष्य करताना गुरुवारी केरळमध्ये त्यांनी माध्यमांशी बोलताना हे भाष्य केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे भाजपाचे दोन्ही नेते आपल्याच जगात जगत असतात आणि गोष्टींबद्दल कल्पना करीत बसतात, असे राहुल गांधी यांनी टीका आहे. सध्या सुरू असलेल्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशनातही विरोधकांनी सभागृहात मोदी सरकारवर आर्थिंक मंदीवरुन टीका सुरु केली आहे. नुकतेच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन राज्यसभेत देशाच्या आर्थिक स्थितीबाबत उत्तर देत असताना यावरुन विरोधी खासदारांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला होता.

Protected Content