कोरोना : यावल नगरपरिषद युद्ध पातळीवर कार्यरत : नगरसेवकांची पाठ

यावल, प्रतिनिधी । जगात कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र हाहाकार माजलेला आहे. याचा प्रसार देशासह राज्यात होत आहे. याकाळात देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्याने गरीबांना कोणताही कामधंदा मिळत नसल्याने सामाजिक संस्था त्यांना मदत करत आहेत. मात्र, नगरसेवकांनी यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहावयास मिळत आहे.

कोरोना व्हायरसच्या संकटाच्या काळात समाजसेवी संस्था, विविध पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सदस्य आदी मंडळी या गरजू नागरिकांच्या मदतीसाठी आप आपल्या परीने विविध प्रकारचे मदत व सहकार्य करीत आहेत. मात्र, यावलचे नगरसेवक अनेक दिवसांपासून नागरिकांची मदत करण्याएवजी शहरातूनच अदृष्य झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या नगरसेवकांना आपल्या सामाजिक कर्तव्याचा विसर पडला की काय ? अशी भावना शहरातील नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. एकीकडे नगरपरिषदचे सुमारे १०० कर्मचारी युद्धपातळीवर शहरात स्वच्छता करण्यासाठी पुढे सरसावले असतांना दुसरीकडे लोकांनी निवडून दिलेले नगरसेवक हे कुठेच दिसून येत नसल्याने यावलकरांच्या मनात नगरसेवकांची प्रतिमा व प्रतिष्ठा समाज मनातून मलिन होत असल्याची संतप्त भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

Protected Content