जामनेरात भाजपतर्फे नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन

जामनेर प्रतिनिधी । महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नबाब मलिक हे राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व बेछूट आरोप करीत असून यांच्या निषेधार्थ जामनेर तालुका भाजपातर्फे नवाब मलिक यांची पुतळा दहन करून निषेध करण्यात आला.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक घे फक्त मिडिया समोर राहण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्यावर बिनबुडाचे खोटे आरोप करीत असून स्वतः नगरमध्ये यांचे जावई हे ड्रेस प्रकरणांमध्ये सापडले आहे. नबाब मलिकचे बाल स्पोर्ट प्रकरणातील आरोपींची संबंध असल्याचे काल दि. ८ रोजी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. त्यामुळे अशा माणसाला ठाकरे सरकारने मंत्रिमंडळातून काढावे व नबाब मलिक यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करून नवाब मलिक यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी जि.प. सदस्य अमित देशमुख, जि.प.सदस्य पती दिलीप खोडपे, नगर पालिका गटनेते डॉक्टर प्रशांत बोंडे, उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, तुकाराम निकम, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, बंटी वाघ, उल्हास पाटील, कमलाकर पाटील, राजधर पांढरें, दिपक तायडे, कैलास पालवे, पार्टी अण्णा पीठोडे, नाना वाणी, बाबुराव हिवराळे, रवींद्र झाल्टे, विनोद पाटील, कैलास पालवे, नाईक तेजस पाटील, यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content