दहिगाव बनले अवैद्यधंद्यांचे माहेरघर

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगावात गावठी दारूची सर्रास विक्रीसह जुगार अड्डे व सट्टा मटका इतर अवैद्यधंद्यांचे माहेरघर बनले. या सर्व प्रकारामुळे महिला वर्ग हे कमालीचे त्रस्त झाले, जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्याकडे या अवैद्य धंद्याविषयी तक्रार केल्यानंतर देखील या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची ग्रामस्य महिलांची ओरड आहे.

या संदर्भात दहिगाव गावात व परिसरात मोठया प्रमाणावर गावठी दारू , जुगारीचे अड्डे , पत्यांचे अड्डे अशी सर्व अवैध धंदे गेल्या अनेक वर्षापासुन सुरू असुन दारूडे हे गावात महीला व मुलींना अश्लील शिवीगाळ करीत असतात , यासंदर्भात महीलांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत दहिगाव ग्राम पंचायत ने दिनांक १६/०६ /२०२२ रोजी थेट ग्रामसभा घेत दहिगाव गावाच्या हद्दीत सुरू असलेले सर्व प्रकारची अवैध धंदे संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या विषयावर बोलतांना ग्रामस्यांनी गावात अवैद्य गावठी दारूच्या व्यसनाधीन झालेल्या दारूड्यांमुळे गावात सार्वजनिक ठिकाणी व गावातील गल्ली बोळात सर्वत्र भांडणतंटे मारहाणीच्या घटना वाढलेले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

या सर्व प्रकारामुळे गावातील तरूण हे दारू व्यसनाच्या आहारी गेल्याने त्यांचे व कुटुंबाचे आयुष्य उद्धवस्त होत असल्याने ग्रामस्थ महीलांनी ग्रामसभेत अवैद्य धंद्या विषयी आपली आक्रमक भुमिका मांडली तसेच या दारूबंदी व ईतर अवैद्य धंद्या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करुन देखील या ग्रामस्थांच्या आयुष्याशी निगडीत व गंभीर अशा प्रश्ना संदर्भात सरपंच म्हणतात दारूबंदी करणे हा आमचा विषय नसुन तो पोलीसांचा आहे तर दारू विक्री करणारे म्हणतात आम्ही पोलीसांना हप्ते देतो असा प्रश्न समोर आल्याने ग्रामसभेत एकच गदारोळ निर्माण झाला.

या सर्व संदर्भातील पुराव्यासह संबधीत अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात याव्यात अशी एकमुखी मागणी ग्रामसभेत ठरावा द्वारा करण्यात आली असुन संबधीत तकार करणाऱ्यांनी ही सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांकडे सादर केली असुन या काय कार्यवाही होते याकडे दहिगाव गावातील अवैद्य धंद्यांमुळे त्रस्त झालेल्या महिलांचे व नागरीकांचे लक्ष लागले आहे.

याबाबत यावल पोलीस स्टेशनला सरपंच अजय बाळु अडकमोल यांनी १o जुन २३ रोजी तर राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय येथे दि. ५  गावातील जितेन्द्र शालीक पाटील यांनी पोलीस अधिक्षक यांच्याकडे लिखित तक्रारी केल्या असुन देखील अद्याप कुठल्या ही प्रकारची दखल प्रशासना कडुन घेण्यात आलेली नसल्याने तात्काळ या सर्व अवैद्य धंद्यांना कायमची बंदी न घातल्यास महीलांच्या वतीने तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content