केळी उत्पादकांना चांगल्या भावाची अपेक्षा; चिनावलच्या शेतकऱ्यास मिळाला समाधानकारक भाव

सावदा प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे रावेर, यावलसह संपूर्ण जिल्ह्यातील केळी उत्पादकांनवर अस्मानी व सुलतानी संकटासह केळी मालाची मागणी घटली होती तर थोडे फार व्यापारी केळी माल खरेदी करीत होते मात्र अत्यंत कमी भावाने खरेदी करीत होते. यामुळे केळी उत्पादकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

मात्र गेल्या २ ते ३ दिवसापासून केळी मालाची मागणी वाढल्याने व येणाऱ्या रमजानच्या पार्श्वभूमीवर ही केळी ची मागणी होवू लागल्या ने तसेच आखाती देशात ही निर्यात होत असल्याने सद्यस्थितीत भाव ही टपटप्याने वाढत आहे. यामुळे केळी उत्पादकांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे.

सध्या ८२० रु भाव आहे मात्र काही ठिकाणी जादा भावाने ही मागणी होताना दिसत आहे. आज चिनावल येथील केळी उत्पादक टेनू नेहते यांच्या केळीला ८०० रुपये भाव मिळाला असाच भाव यापुढे ही मिळत राहावा अशी आस उत्पादकांना लागली आहे तर या पुढे केळीला बऱ्यापैकी भाव मिळेल असा अंदाज ही केळी खरेदी-विक्री क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे. एकंदरीत थोडे थोडे का होईना केळीच्या भावात सुधारणा होत असल्याने उत्पादकांना मात्र चांगले भाव मिळण्याची आस लागली आहे.

Protected Content