देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा – अशोक लाडवंजारी

जळगाव प्रतिनिधी । विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी व अमोल कोल्हे यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध आणि मुख्यमंत्री असतांना त्यांनी सत्तेचा गैरवापर केला, मंत्री नवाब मलिक यांच्यावर बेछुट आरोप केले आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे मंत्री पदावर असतांना त्यांच्यावर दाऊदच्या बायकोशी संभाषण केल्याचे आरोप होता देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा मागितला होता. त्याचप्रमाणे नैतिकतेच्या आधारावर विरोधी पक्ष नेते देवेद्र फडणवीस यांनी देखील आपल्या विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी व अमोल कोल्हे यांनी बुधवारी १० नोव्हेंबर रोजी प्रसिध्दीपत्राद्वारे केली आहे.

Protected Content