ओजस्विनी कलादालनात पोस्टर स्पर्धेचे आयोजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित मूळजी जेठा महाविद्यालयाच्या फाईन आर्ट विभागाद्वारे ओजास्विनी कलादालनात पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ३५ विद्यार्थी सहभागी झाले. यशस्वी विद्यार्थांचा गुण गौरव तथा त्यांच्या चित्रांना प्रोत्साहनपर प्रदर्शन भरविण्यात आले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, प्राचार्य सं.ना. भारंबे यांचे मार्गदर्शन लाभले. ओजस्विनी कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.मिलन भामरे यांनी सर्व सहभागी विद्यार्थांचे प्रोत्साहनासह कौतुक करून योग्य असे आशावादी भविष्यातील पूर्व नियोजनाची तयारी करण्याबाबत अपेक्षित मार्गदर्शन केले

याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. या पोस्टर स्पर्धेत स्वतंत्र संग्रामात खानदेशातील क्रांतीकारांचे योगदान, स्वर्णिम युगाकडे भारताची वाटचाल आणि जरा याद उभे भी करलो असे ३ विषय देण्यात आले होते.

 

Protected Content