पांडे डीएड महाविद्यालयात तीन दिवशीय कार्यशाळा उत्साहात

pppp

पाचोरा (प्रतिनिधी) येथील संत गाडगेबाबा शिक्षण संस्था अंतर्गत प्रदीप एम पांडे डी एड स्पेशल एम आर कॉलेज व बहुविलागता संस्थान चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने भारतामध्ये दिव्यांगांचे अधिकार आणि सद्यस्थिती तसेच दिव्यांगांविषयी योजना व कार्यक्रम या विषयांवरती तीन दिवशीय विभागीय कार्यशाळा 23 फेब्रुवारी 2014 ते 25 फेब्रुवारी 2019 या कालावधीत संपन्न झाली.

 

या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला एस एस एम एम कॉलेज प्राध्यापक मा अधिष्ठान समाजशास्त्र विभाग उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे डॉक्टर बी एन पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर जे पी बडगुजर मानसशास्त्र विभाग एम एम कॉलेज बी ओ एस मेंबर पुणे निरीक्षक प्रा मनीराम हजारे राष्ट्रीय बहुविकलागता संस्थान चेन्नई प्रतिनिधी म्हणून जगन मुदंगले एन आय एम एच मुबई धनंजय देशमुख आय टी ई विद्यापीठ गांधी नगर गुजरात हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन प्रतिमा पूजन करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पांडे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष बी एन पाटील यांनी ग्रामीण भागातील तरुणांनी या सर्व शेतकरी प्रविष्ट होऊन समाजातील या वंचित घटकाला मुख्य प्रवास समावेश करण्यासाठी प्रयत्न करावे, असे मनोगत व्यक्त केले. या तीन दिवसीय कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात डॉ व्ही बी पाटील,वेंद्यकीय अधिकारी डॉ संजय माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या समारोपीय कार्यक्रमात डॉक्टर संजय माळी यांनी जीवनात सकारात्मक ती कशी असावी आणि त्या सकारात्मक ऊर्जेचा उपयोग व्यक्तींना व समाजाला कसा होतो, याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेत सहभागी विशेष शिक्षण क्षेत्रातील तज्ञांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रदीप पांडे डी एड महाविद्यालयातील मुख्याध्यापक शिक्षक व सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content