शरद कोळी यांच्या वक्तव्याचा कोळी बांधवांनी केला निषेध ( व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोळी आडनावाचा फायदा घेवून इतर जिल्ह्यातील व्यक्ती भाषण व वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या युवासेनेचे शरद कोळी यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील याच्याबद्दल बेताल  वक्तव्य केल्याचा आरोप जळगाव जिल्ह्यातील कोळी समाज बांधवांनी करत पत्रकार परिषदेत तीव्र शब्दात शरद कोळी यांचा  निषेध व्यक्त करण्यात आला.

शासकीय अजिंठा विश्रामगृह येथे कोळी समाजाच्या वतीने मंगळवारी ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, राजेंद्र सोनवणे, जनाआप्पा कोळी, यांच्यासह अन्य मान्यवरांनी पत्रकार परिषद घेऊन शरद कोळी यांच्याबाबतची भूमिका स्पष्ट केली.

याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉ. श्रीधर साळुंखे यांनी बोलतांना सांगितले की, कोळी समाज बांधवांचा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना पाठींबा आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याचे तथा युवा सेनेचे विस्तारक शरद कोळी हे जरी समाज बांधव असला तरी कोळी समाजाच्या नावाने गैरफायदा घेणे चुकीचे आहे. शिवाय शरद कोळी हे जळगाव जिल्ह्याचे व्यक्ती नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून कोळी समाज बांधवांच्या जातीचे प्रमाणपत्र आणि व्हॅॅलीडीटीचे यासह अनेक प्रश्न प्रलंबित होते. दरम्यान, महाराष्ट्र राज्यात शिंदे व फडणवीस सरकार आल्यापासून कोळी समाजाचे अनेक प्रश्न सोडविले जात आहे. त्यामुळे कोळी समाज बांधव सत्ताधारी मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत.  इतर मंत्र्यांबाबत बेताल वक्तव्य करणारे शरद कोळी यांना जळगाव जिल्ह्यातील कोळी समाज बांधव समर्थन देणार नाही अशी भूमीका जळगाव जिल्ह्यातील कोळी समाज बांधवांनी स्पष्ट केली. दरम्यान शरद कोळी हे सुपारीबाज असून त्यांना कुणी तरी इथे खास हेतूने बोलावले होते. त्यांनी राजकीय हेतूने केलेल्या वक्तव्याशी आम्ही समाजबांधव सहमत नाहीत असे देखील मान्यवरांनी सांगितले. याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, राजेंद्र सोनवणे, जनाआप्पा कोळी आदी उपस्थित होते. 

 

 

Protected Content