सर्वच जबाबदारी केंद्राची आहे? मग द्या न केंद्राकडे – फडणवीस

आरक्षणाच्या प्रश्नावरून मविआवर देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यापासून वारंवार कोर्टाकडून ताशेरे ओढल्यानंतरहि इम्पिरीकल डेटा जमा करता आला नाही, जो तो उठतो हि सर्व जबाबदारी केंद्राची आहे!. तर मग तुमची जबाबदारी कोणती? मग द्या ना केंद्राकडे जबाबदारी, केंद्र सरकार चालवेल, अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षण निर्णयानंतर आज मुंबईत वसंत स्मृती येथे भाजपच्या ओबीसी मोर्चाची बैठक घेण्यात आली. कोणतीही किमत मोजावी लागली तरी ओबीसी आरक्षण लढा लढवू, आणि आगामी ज्या कोणत्याही निवडणुका असतील त्यात ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणार असल्याचा निर्धार या बैठकीवेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

 भाजपचा डीएनए मुळातच ओबीसी आहे. पंतप्रधानच नव्हेतर भाजपमधील बहुतांश मंत्री ओबीसी आहेत. राज्यात महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न चिघळला असून सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशानुसार विना आरक्षण निवडणुका घेण्याची वेळ आली आहे.

तुम्ही फक्त वसुलीसाठी का!

महाविकास आघाडीला सत्तेवर येऊन दोन अडीच वर्षात कोर्टाने सात वेळा तारीख देऊनही ओबीसींचा इम्पिरीकल डेटा संकलित करता आला नाही. खोट्या सबबी नुसार पुढच्या तारखा देखील देण्यास नकार देत वारंवार कोर्टाकडून ताशेरे ओढल्याने तोंडघशी पडले असले तरी मुजोरी कशी करायची ती यांच्याकडून शिकावी. ओबीसी इम्पिरीकल डेटा संकलन जबाबदारी सरकारची असे कोणीही उठतो आणि सांगत असेल तर तुम्ही कशासाठी सरकारमध्ये आहात. तुम्हाला का फक्त वसुलीसाठी जनतेने निवडून दिले आहे का? अशी टीका फडणवीस यांनी या बैठकीत केली.  डेटा संकलन जबाबदारी जर केंद्राची असेल तर द्या ना केंद्राकडे. सरकार चालवेल पण आणि जबाबदारी पार देखील पाडेल, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!