सट्टा, जुगार अड्ड्यावर कारवाई !

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर आज सोमवारी २९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तालुका पोलीसांनी छापा टाकून जुगाराचे साहित्‍य व रोकड असा एकूण ३ हजार १३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, “जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे दोन जण सट्टा जुगार अड्डा सुरू करून लोकांकडून पैसे घेत असल्याची गोपनिय माहिती जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाईच्या करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

आज सोमवारी २९ ऑगस्ट रोजी पथकाने दुपारी १२ वाजता कारवाई करत दोन जणांवर छापा टाकला. याप्रकरणी सुभाष अशोक सोनवणे (वय-३०) आणि अमोल गोकुळ चोपडे (वय-३३) रा. नांद्रा ता.जि.जळगाव यांच्यावर जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांकडून जुगाराचे साहित्‍य व रोकड असा एकुण ३ हजार १३५ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.” पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content