सुसाट कारची डंपरला जोरदार धडक; पाच जण जखमी !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मुक्ताई चौकातील उड्डाणपुलावर भरधाव वेगाने येणाऱ्या कारने डंपरला मागून जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मलकापूर येथून जळगावकडे येणारी कार क्रमांक (एमएच १४ ईपी ६८६७) ही मुक्ताईनगर शहरातील मुक्ताई चौकातील उड्डाणपुलावरून सुसाट वेगाने जात असतांना पुढे जाणाऱ्या डंपर (एमएच १९ सीवाय ७७३३) ला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह इतर चौघे असे पाच जण जखमी झाले. जखमीतील एकाची प्रकृती चिंताजनक असून जखमींना तातडीने स्थानिक नागरीक व वाहनधारकांच्या मदतीने मुक्ताईनगर ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कारचे एअरबॅग्ज ओपन झाल्यामुळे इतर बचावले आहे. या अपघातात कारचा पुढच्या भागाचा पुर्णपणे चुराडा झाला आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. अपघातामुळे उड्डाणपुलावर वाहतूकीचा खोळंबा झाला होता. स्थानिक पोलीसांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आले.

Protected Content