पैशांसाठी विवाहितेला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण येथील माहेर असलेल्या विवाहितेला पैशांची मागणी करत दारूच्या नशेत मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरूण येथील माहेर असलेल्या चेतना भावेश चौधरी यांचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील वाकडी येथील भावेश नामदेव चौधरी यांच्यासोबत २००३ मध्ये रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर काही वर्षे संसार व्यवस्थीत सुरू आसतांना भावेश चौधरी याने विवाहितेला माहेरहून पैसे आणावे अशी मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला पती भावेश चौधरी हा दारूच्या नशेत मारहाण करू लागला. तसेच सासू आणि नंदे यांनी देखील विवाहितेला पैशांसाठी तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता अखेर माहेरी निघून आल्या. शनिवार ११ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती भावेश नामदेव चौधरी, सासू विमल नामदेव चौधरी रा. वाकडी ता. चाळीसगाव आणि ननंद छायाबाई शिवाजी महाले रा. बहाड ता.चाळीसगाव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.

Protected Content