ॲड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये अपुर्व सुभेदार दहावीत तर स्नेहल पाटील बारावी सायन्समध्ये सीबीएसई बोर्डात प्रथम

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे दरवर्षीप्रमाणे इयत्ता दहावी -बारावीचा शंभर टक्के निकाल लागला असुन यशाची घोडदौड कायम आहे. ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या अपुर्व अजय सुभेदार ह्या विद्यार्थ्याने ९७.२०% तर बारावीची स्नेहल अनिल पाटील हिने ८०% मिळवत सीबीएसई बोर्डाच्या परिक्षेत अमळनेर, चोपडा व पारोळा विभागात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
इयत्ता दहावीच्या निकालात पुढील पाच विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले. रुही राहुल पाटील ९३.४०% , प्रज्ञा उमेश केदार ९०.४०%, गायत्री राजेंद्र बडगुजर ८९.८०%, लुइझा ऐराझ खान आणि संदेश सुधाकर पाटील विभागून ८७.२०%, तर इयत्ता बारावीच्या निकालात कु. प्रांजल अशोक साळुंके ७०.२०%या सर्व विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावी व बारावीच्या निकालात नेत्रदीपक गुण मिळवुन घवघवित यश संपादन केले आहे. सदर विद्यार्थ्यांना शाळेतली प्राचार्य, सर्व विषय शिक्षक व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या ह्या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय ॲड. ललिता पाटील, सचिव प्रा श्याम पाटिल, संचालक पराग पाटील ,प्रा देवेश्री पाटील प्राचार्य नीरज चव्हाण यांनी शुभेच्छा देत सर्व गुणवंताचे ,पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

Protected Content