कोरोनाशी सामना : बाधितांवर बरे झालेल्यांची ९८ची आघाडी

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज आढळून आलेल्या अहवालात कोरोनाच्या सामन्यात बरे झालेल्यांची बांधितांवर ९८ ची आघाडी असल्याचे दिसून येत आहे. आज जिल्ह्यात ७०३ रूग्ण कोरोना बाधित आढळले आहे. तर आजच ८०१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. यात जळगाव शहरासह चोपडा, जामनेर आणि अमळनेर तालुक्यात रूग्ण संख्येत वाढ कायम आहे.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१०३; जळगाव ग्रामीण-२५; भुसावळ-४९; अमळनेर-७०; चोपडा-९९; पाचोरा-३०; भडगाव-२०; धरणगाव-२७; यावल-१४; एरंडोल-६५, जामनेर-९३; रावेर-१५; पारोळा-८; चाळीसगाव-२७; मुक्ताईनगर-२२, बोदवड-३२ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ४ असे एकुण ७०३ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्हानिहाय आकडेवारी
जळगाव शहर-९५१८, जळगाव ग्रामीण-२१९६; भुसावळ-२५४१; अमळनेर-३७७३; चोपडा-३५७३; पाचोरा-१६७७; भडगाव-१६७०; धरणगाव-१८८१; यावल-१३८७; एरंडोल-२५९२, जामनेर-३०३२; रावेर-१७५७; पारोळा-२०८४; चाळीसगाव-२७५१; मुक्ताईनगर-११३८, बोदवड-६७५ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील ३१४ असे एकुण ४२ हजार ५५९ रूग्ण आढळून आले आहेत.

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या ४२ हजार ५५९ इतकी झालेली आहे. यातील ३१ हजार ५०३ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ८०१ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज १८ मृत्यू झाले असून मृतांचा एकुण आकडा १०६१ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ९ हजार ९९५ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content